औरंगजेबाचे पोस्टर दाखवले, आंदोलन करण्याचं कारण काय: शरद पवार
07-Jun-2023
Total Views |
मुंबई : औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक व्यक्ती नाचत असल्याचं समोर आले. या प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात दंगल करण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच फोटो दाखवला तर काय परिणाम होतो? असा सवाल केला आहे.
"नगरला काही तरी झालं. कोल्हापूरला काही झालं. कुणी तरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, नाही असे नाही. पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोत्साहित करतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही."
"ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले झाले. चर्च आणि ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय असतो. काही तक्रार असेल तर पोलिसांना सांगितली पाहिजे. पण म्हणून चर्चवर हल्ला करण्याची गरज काय आहे? या मागे एक विचारधारा आहे. ती विचारधारा सामाजाच्या हिताची नाही." अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.