मुंबई : कधी कधी वाटतं औरंगजेबाचा दुसरा जन्म म्हणजे शरद पवार, असं माजी खासदार निलेश राणेंनी म्हटलं आहे. शरद पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना काही चर्चवर झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत मोठं विधान केलं होतं. “या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्या बाबत चिंता वाटावी असं चित्र आहे. ख्रिश्चन समाजाच्या चर्चवर हल्ले होत आहेत. मुस्लीम समाजात चार-दोन लोकांकडून चुका होऊ शकतात. तशा हिंदूंकडूनही चुका होतात.” असं शरद पवार म्हणाले होते.
पवारांच्या या वक्तव्याला प्रत्त्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले, "निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार." असं ट्विट करुन राणेंनी सोबत एका वृत्तवाहिनीच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.