नवी दिल्ली : अमेरिका लवकरच बंगलोर आणि अहमदाबाद येथे नवीन वाणिज्य दूतावास चालू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाचा भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात.
२०२२ या वर्षात एच-१बी व्हिसा मिळालेल्या सुमारे ४,४२,००० कामगारांपैकी ७३ टक्के कामगार हे भारतीय होते. सध्या मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथे अमेरीकेचे चार वाणिज्य दूतावास आहेत. बंगलोर आणि अहमदाबाद येथे नवीन वाणिज्य दूतावास चालू झाल्यावर भारतात अमेरिकेचे ६ वाणिज्य दूतावास होतील.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार रोजगाराच्या शोधात अमेरिकेला जातात. या कामगारांना अमेरिकेत राहण्यासाठी एच-१बी व्हिसा आवश्यक असतो. एच-१बी व्हिसा धारकाला अमेरिकेत ३ वर्ष काम करण्याची परवानगी मिळते.