नवी दिल्ली : दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका १६ वर्षीय मुलीचा ३६ वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध त्याच्यावर वार करण्यात आले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. साहिल नावाच्या मुलावर हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि मुलगी मित्र होते, मात्र दि. २८ मे रोजी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले.
पीडीत मुलगी ही तिची मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना साहिलने वाटेत पीडीतेला अडवून तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर तिच्यावर दगडाने हल्ला केला. सध्या आरोपी साहिल फरार आहे. पोलिसांचे पथक त्याच्या शोधात आहेत.व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, आरोपी साहिलने मुलीला अडवून सुरूवातीला तिच्यावर चाकूने ३६ वार करतो. यादरम्यान लोक तिथून जात असतात, पण साहिलला कोणीही रोखण्याचा प्रयत्न करत नाही.
लोकांनी साहिलला थांबवले असते तर कदाचित मुलीचे प्राण वाचले असते. पंरतू काहीवेळाने चाकूने हल्ला करूनही साहिलचे समाधान झाले नसल्याने तो त्या मुलीला दगडाने ठेचून मारू लागतो. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांचे फथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी लोकांकडून या प्रकरणाची चौकशी केली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेबाबत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही ट्विट केले की, “दिल्लीच्या शाहाबाद डेअरीत एका अल्पवयीन निष्पाप मुलीवर चाकूने वार करण्यात आले आणि नंतर दगडाने ठेचण्यात आले. दिल्लीतील या घटनेने सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत मी यापेक्षा भयंकर काहीही पाहिले नाही, असे विधान स्वाती मालीवाल यांनी केले आहे.