‘लव्ह जिहाद’चे वास्तव नाकारणे ही क्रूरताच’

योगिता साळवी : ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’अभियान

    29-May-2023
Total Views | 708
Love Jihad sabha

(‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा झालाच पाहिजे, अशी एकमुखाने मागणी करत उपस्थितांनी ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या अभियानाला उदंड प्रतिसाद दिला.)
 
पुणे : देशभरामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू माता भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना हे वास्तव राजकीय मतांसाठी नाकारले जाणे हीदेखील एक प्रकारची क्रूरता असल्याचे परखड मत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. पुण्यातील स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने रविवार, दि. 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अ‍ॅड. ईशानी जोशी, संस्थेच्या विश्वस्त स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. सर्वांचे स्वागत कुलकर्णी यांनी केले. यावेळी गटप्रमुख महिलांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच ‘लव्ह जिहाद’विषयक काम करणार्‍या विजयराव कांबळे यांनादेखील सन्मानित करण्यात आले.

साळवी यापुढे म्हणाल्या, ‘’मुंबईमध्ये घडलेल्या रूपाली चंदनशिवेची हत्या, श्रद्धा वालकरची आफताब पूनावालाने केलेली हत्या या क्रूर मानसिकतेचे लक्षण आहेत. अशा एक ना शेकडो घटना उजेडात येत आहेत. हिंदू मुलींना आपले कायदे हक्क समजावून सांगितले पाहिजेत. त्यांची सद्ससद्विवेक बुद्धी जागृत करणे आवश्यक आहे. त्यांना धार्मिक ज्ञान देणे ही काळाची गरज बनली आहे. भविष्यातील धोकेदेखील त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. आपल्या मानसिकतेमध्ये विष कालविण्याचे काम एका इको सिस्टीमकडून सुरू आहे,” असे त्या म्हणाल्या.

“राजकीय पुढारी हे वास्तव नाकारत आहेत. त्यामागे त्यांची मतांची गोळाबेरीज आहे. सुप्रिया सुळे, शशी थरूर, पिनाराई विजयन आदींसारखे नेते हे वास्तव नाकारतात. परंतु, वास्तव नाकारले तरीदेखील त्यांना सत्ता कधीही मिळणार नाही. सुप्रिया सुळे यांनी किरण कुलकर्णी यांच्याबाबत अर्धसत्यच सांगितलं. सुळे या सवर्ण हिंदू मुलींना मुस्लिमांशी लग्न करण्यासाठी उद्युक्त करीत आहेत काय? असा सवाल त्यांनी केला, राजकारणाची संवेदनशीलता संपल्याचे,” त्या म्हणाल्या.“झोपडपट्टीतील गरीब, पीडित, दलित कष्टकरी असो की सवर्ण ब्राह्मण, मराठा असो सर्वानाच हा धोका आहे. आपल्या मुली त्याच्यापासून अनभिज्ञ आहेत. मुस्लीम मुली हिंदू मुलांच्या प्रेमात पडत नाहीत. त्या त्यांचे धर्माचरण अत्यंत गांभीर्याने करतात. बुरखा घालतात. नमाज पढतात. आपल्या मुली आपल्या धर्माचे पालन का करत नाहीत,” असा परखड सवाल त्यांनी केला.

“श्रीमंत आणि संपत्ती तसेच मुली असलेल्या महिलांना जाळ्यात अडकवले जाते आणि त्यांची संपत्ती आणि मुली पळवल्या जातात. अशीदेखील प्रकरणं समोर आलेली आहेत. या सर्व गोष्टींना कायद्याने आळा घालता येईलच असे नाही. त्यामुळे आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा व्हायलाच हवा. हिंदू मुलींनी ’मेरा अब्दुल वैसा नही है’ ही मानसिकता सोडून डोळसपणाने त्याकडे पाहिले पाहिजे. हा धोका आपल्या उंबरठ्यावर आलेला आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव खेडकर यांनी केले. त्यांनी स्वामी विवेकानंद विचारमंचच्यावतीने चालणार्‍या रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, विविध स्पर्धा आणि सेवाकार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन थिटे यांनी केले.



अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121