कर्नाटकचा काँग्रेसला स्पष्ट कौल, भाजपचा पराभव

राहुल गांधींना विजयामुळे हुरूप तर बोम्मई करणार निकालाचे विश्लेषण

    13-May-2023
Total Views | 107
karnataka

नवी दिल्ली
: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३६ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपला केवळ ६४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यासोबतच सातत्याने अपयशाचा सामना करावा लागणाऱ्या काँग्रेसला यशामुळे दिलासा मिळाला आहे.
कर्नाटकच्या विधानसभेच्या २२४ मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर १३ मे रोजी झालेल्या मतमोजणीनंतर मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट कौल दिला असून १३६ जागा बहाल केल्या आहेत. त्याचवेळी भाजपला ६४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्याचवेळी किंगमेकर होण्याचे वेध लागलेल्या जनता दल – सेक्युलरला (जेडीएस) अवघ्या २० जागा प्राप्त झाल्या आहेत.

या निकालामुळे काँग्रेस पक्षासह माजी खासदार राहुल गांधी यांचा उत्साह वाढला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने प्रारंभापासून केलेला आक्रमक प्रचार, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमार यांच्यातील समन्वयामुळे काँग्रेस हा भाजपला समर्थ पर्याय असल्याचे मतदारांवर ठसविण्यात यश आल्याचे दिसते. त्याचवेळी भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत कलहाचा फटका पक्षास बसल्याचे दिसते. त्याचप्रमाणे उमेदवारी वाटपावेळी निर्माण झालेली नाराजी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रदेशस्तरावर समर्थ नेतृत्व नसल्याची मतदारांची भावना यामुळे भाजपला सत्ता राखता आली नसल्याचे दिसते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121