मुंबई : 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा हिने शिव तांडव गायन केले. शिव तांडव गायनाचा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाल्याची पहायला मिळते आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर वादंग उठलेले असताना अभिनेत्री अदा शर्मा हिने इंस्टावर पोस्ट करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की. शिव तांडव गायल्याने मला नवी ऊर्जा मिळाली, चेहऱ्यावर एकप्रकारे नवचैतन्य आल्याची भावना तिने आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.
'द केरला स्टोरी' हा चित्रपट गेल्या आठवड्यात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत ६६ कोटी रूपयांची कमाई बॉक्सऑफिसवर केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला तामिळनाडू, पश्चिम बंगाल राज्यातून विरोध दर्शविण्यात आला. तेथील सरकारने या प्रदर्शनावर बंदी घालण्याची भूमिका घेतली होती. या भूमिकेच्या विरोधात चित्रपट निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली. वकील हरीश साळवे हे चित्रपट निर्मात्यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. येत्या काही दिवसांत त्यावर सुनावणी होणार आहे.