प्रदुषणमुक्त दिल्लीसाठी ६५ हजार कोटींचे प्रकल्प - परिवहन मंत्री नितीन गडकरी

दिल्ली – डेहराडून एक्सप्रेस वेचा घेतला आढावा

    07-Apr-2023
Total Views | 42
 Union-Ministry-of-Transport

बागपत
: देशाची राजधानी दिल्लीस प्रदुषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी ६५ हजार कोटी रुपयांचे रस्ते – महामार्गबांधणी प्रकल्प सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी उत्तर प्रदेशातील बागपत येथे दिली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली ते डेहराडूनचे २४० किमीचे अंतर अवघ्या अडिच तासांवर आणणाऱ्या दिल्ली – डेहराडून द्रुतगती महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या सहापदरी हरित द्रुतगती महामार्गामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपतचा विकास होणार आहे. बागपत ते दिल्लीचे अंतर अवघ्या २५ ते ३० मिनीटांवर येणार आहे. त्यामुळे हरियाणातील गुरूग्राम आणि उत्तर प्रदेशातील नोएडाप्रमाणेच सॅटेलाईट सिटी म्हणून बागपतचा विकास होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

दिल्लीतील अक्षरधाम ते शास्त्री पार्क, खजुरी खास, खेकरा येथील ईपीई इंटरचेंज, शामली मार्गे मंडोला बागपत, सहारनपूर ते डेहराडून असा १२ हजार कोटी रुपये खर्चून २१२ किमीच्या महामार्गाची बांधणी होत आहे. या संपूर्ण कॉरिडॉरच्या बांधकामात प्रामुख्याने अनेक विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये गणेशपूर ते डेहराडून हा मार्ग वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित ठेवण्यात आला आहे. यामध्ये १२ किमी उन्नत मार्ग, ६ प्राणी अंडरपास, २ हत्ती अंडरपास, २ मोठे पूल आणि १३ लहान पुलांची तरतूद आहे. संपूर्ण द्रुतगती मार्गावर अवजड, मध्यम आणि लहान वाहनांसाठी अंडरपास, नदीवरील पाच पूल, ६२ बसस्थळे, ७६ किलोमीटरचा सर्व्हिस रोड, १६ एंट्री-एक्झिट पॉइंट्सही बांधण्यात येत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121