वॉशिंग्टन : नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने २१ वर्षांपूर्वी अंतराळात पाठवलेला एक उपग्रह बुधवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता अवकाशातून पृथ्वीवर पडणार आहे. उपग्रह कधी आणि कुठे पडेल याची अचूक वेळ आणि मार्ग याचा अंदाज शास्त्रज्ञांना सांगता येत नसल्याने चिंता वाढली आहे. २७३ किलो वजनाचा उपग्रह निवासी भागात पडला तर मोठा त्रास होऊ शकतो.