साई ब्लड स्टोरेज सेंटर वनवासी बांधवांच्या सेवेत

रा स्व संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा संचालित सेंटर

    16-Apr-2023
Total Views | 53
Inauguration of Sai Blood Storage Center rss

कल्याण
: रा स्व संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा संचालित, साई ब्लड स्टोरेज सेंटरचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. शहापूर सारख्या वनवासी भागात गंभीर रुग्णांना लवकरात लवकर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या आर्थिक सहकार्याने हे केंद्र शहापूर येथे सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी ठाण्यातील कै वामनराव ओक रक्तपेढी चे बहुमोल सहकार्य लाभले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या शहापुरात वाढते अपघात,नित्य होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि रुग्णांमधील रक्ताल्पता विचारात घेऊन हे केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे.

Inauguration of Sai Blood Storage Center rss

या कार्यक्रमाला जनकल्याण समिती प्रांत कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री टाकेश्वर क्षेत्र येथील मठाधिपती परम पूजनीय योगी फुल नाथ बाबा यांनी केले. साई ब्लड सेंटर संचालक डॉक्टर रवींद्र बडगुजर, रा स्व संघ जनकल्याण समिती शहापूर तालुकाप्रमुख राजेश शहा , रा स्व संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा अध्यक्ष गिरीश दीक्षित, जनकल्याण समिती विभाग कार्यवाह अविनाश जोशी व रत्नाकर थत्ते उपस्थित होते.

त्याचप्रमाणे, डॉक्टर उल्हास वैद्य, अच्युत दामले आणि रोटरी क्लब ठाणे राजीव कर्णिक , भिवंडी जिल्हा माननीय संघचालक एडवोकेट शंकर पाटील ,भिवंडी जिल्हा कार्यवाह अमेय आठवले, शहापूर तालुका कार्यवाह गणेश पोद्दार, विभाग प्रचारक मंदार कुलकर्णी, जनकल्याण समिती कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ललित सारंग ,सहकार्यवाह विजयालक्ष्मी बोडस,कोषाध्यक्ष प्रमोद देशपांडे उपस्थित होते. कै वामनराव रक्तपेढी च्या सहकार्याने रक्तदान शिबिरही घेण्यात आले. या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला गावातील ५० लोक उपस्थित होते.





अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121