लाज वाटत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा: नितेश राणे

    02-Mar-2023
Total Views |
लाज वाटत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा: नितेश राणे

मुंबई : विधिमंडळ आणि विधिमंडळ सदस्यांविषयी अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी राऊतांच्या विरोधात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून हक्कभंग आणला जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळ चोर मंडळ असल्याचे विधान करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची हालचाल सुरू झाली आहे. राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, राऊतांच्या वक्तव्यावरुन सभागृहातील सभासद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आमदार, नितेश राणे म्हणाले, "संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी काही अपेक्षा नाही. हे विधीमंडळ नसते तर तो खासदार झाला नसता. लाज वाटत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा. आमच्या मतदार संघात याची धिंड काढली पाहिजे. अशांना राज्यात ठेवता कामा नये. संजय राऊतला आमच्या थोड्या हवाले करा. कायदेशीर प्रक्रिया झालीच पाहिजे. तो स्वतःला फार शिव विर समजतो. त्याची सुरक्षा काढा, मग त्याला कोण घेवून फिरतो आणि आम्ही त्याची काय अवस्था करतो हे त्याने लक्षात ठेवावे." असा इशारा दिला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.