शोभायात्रेच्या निमित्ताने जल साक्षरता अभियानाचे आयोजन

श्री गणेश मंदिरात आयोजित अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

    19-Mar-2023
Total Views | 82
Water Literacy Mission


डोंबिवली
: डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या या जलसाक्षरता अभियानाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
जागतिक जल दिनाचे (दि. २२ मार्च) औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळ, श्री लक्ष्मीनारायण संस्था, ऊर्जा फाऊंडेशन आणि स्वच्छ डोंबिवली अभियान (विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जलसाक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जल संवर्धक विषयक पोस्टर्स, पर्जन्य जल संधारण विषयक लघूचित्रपट आणि उपस्थित नागरिकांशी संवादाद्वारे जल साक्षरता अभियानात जलसंवर्धन विषयक जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित डोंबिवलीकरांना जलसंवर्धन आणि जलसाक्षरतेचे महत्त्व विषद करणारी प्रतिज्ञा देण्यात आली. या अभियानाच्या आयोजनास श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानची संपूर्ण व्यवस्था दहशतवादावर आधारलेली! सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा बुरखा फाडला

पाकिस्तानची संपूर्ण व्यवस्था दहशतवादावर आधारलेली! सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा बुरखा फाडला

पाकिस्तानची संपूर्ण यंत्रणा ही दहशतवादावर आधारलेली आहे. ते दहशतवाद्यांचे आश्रयदाते आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या उपद्रवाचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतात. मात्र, याउलट भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारत जबाबदार देश आहे. आम्ही दहशतवादाबद्दल एक ठाम भूमिका घेत कायमच विरोध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद आम्हाला मान्य नाही, अशी ठोस भूमिका जनता दल युनायटेड (जेडीयू) खासदार यांनी सिंगापूरमध्ये मांडली. ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका पोहोचविणाऱ्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी हे भाषण दिले. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121