मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक यांचे मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षांच्या होत्या. कुंदा नाईक यांनी कौटुंबिक जबाबदार्या सांभाळताना मुंबई महापालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणूनही सेवा बजावली होती.त्यांच्या पश्चात पती राम नाईक यांच्यासह दोन मुली आणि एक नातू असा परिवार आहे. कुंदा नाईक यांच्या निधनावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून नाईक कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.