विधानपरिषदेच्या तालिका अध्यक्षपदी निरंजन डावखरेंसह चार जणांची निवड!
07-Dec-2023
Total Views | 70
नागपूर : निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे या चार सदस्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवार, दि. ७ डिसेंबर रोजी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी याबाबत घोषणा केली.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून नागपूर येथे सुरू झाले. महाराष्ट्र विधानपरिषद नियम - ८, पोटनियम १अन्वये निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विधानपरिषद अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिकाध्यक्षांवर असते.