मुंबई दि.२८: मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३अखेर सुरु करण्याचा मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनचा प्रयत्न होता. मात्र डेपो कनेक्टिव्हीटीची कामे सुरु असल्याने पुढील तीन ते चार महिन्यांनी मेट्रो ३चा पहिला टप्पा नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली. दि.२८ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित अप्पा पेंडसे व्याख्यान कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघाने अप्पा पेंडसे व्याख्यान निमित्त 'मुंबईतील मेट्रोची सद्यस्थिती आणि भविष्यातील मेट्रोचे लोकांना होणारे फायदे' याविषयी व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी अश्विनी भिडे यांनी उपस्थितांना मुंबई मुंबई मेट्रो ३च्या कामांचा प्रगती अहवाल सादर केला. यावेळी भिडे यांनी मुंबई मेट्रो ३च्या प्रस्तावापासून आज पूर्णत्वाकडे जाणारा प्रवास उलगडला. बोगद्यांच्या उत्खनासाठी वापरण्यात आलेल्या पद्धती, बोगदे आणि स्थानकांचे आव्हानात्मक बांधकाम, न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रकल्पांवर झालेले परिणाम, नागरिकांचे पुनर्वसन, कर्जप्रक्रिया आणि याकर्जाची परतफेड करण्याची पद्धती, मुंबईकरांना या प्रकल्पाचा फायदा याविषयी इत्यंभूत माहितीचे सादरीकरण केले. तसेच, मेट्रो३ मुळे भविष्यात पायाभूत सुविधांचा होणार विकास आणि त्याअनुषंगाने बदलत जाणारी मुंबई याविषयी माहिती दिली.
यावेळी, आरे कारशेड महाविकास आघाडी काळात तीन वर्षे रखडल्याने प्रकल्पाला झालेला विलंब आणि आर्थिक नुकसान याविषयीही त्यांनी माहिती दिली. "कारशेडचे कामच होऊ न शकल्याने कारडेपोचेला ३ वर्षे विलंब झाला. यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात १४ हजार कोटींची वाढ झाली. मात्र डेपोच्या विलंबामुळे झालेली ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढला", अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
"मेट्रो ३ च्याविरोधात ९६ केसेस फाईल झाल्या. न्यायालयाने मेट्रो ३च्या हिअरिंग खूप वेळेत घेतल्या. मात्र, समोरच्या बाजूने सारखं इंटरव्हेन्शन करून या केसेस लांबवल्या गेल्या त्यामुळे आम्हाला उशीर झाला. मात्र प्रत्येक निर्णय आमच्या बाजूने आला. काही बाबतीत न्यायालयाने समोरच्याची बाजू समजून घेतली. झाडं कापण्याबाबत न्यायालयाने समिती नेमली ती मागील ५ वर्षांपासून काम करतेय. लोकशाही प्रक्रियेत या सर्व केसेस अत्यंत पारदर्शी पद्धतीने पार पडल्या. त्यामुळे आम्हाला आमचा काम अधिक चांगल्या पद्धतीने मांडता आलं", असेही भिडे यावेळी म्हणाल्या.
पुढे मेट्रो ३च्या पहिल्या टप्पा नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, "ट्रेन आम्ही बीकेसी पासून सिप्झपर्यंत आणली आहे. आम्हाला डेपो कनेक्टिव्हिटीसाठी वेळ लागत आहे.त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस जर आम्ही डेपो जोडू शकलो तर पुढील दोन ते तीन महिने सर्व चाचण्या आणि परवानग्या घेण्यासाठी लागतील. त्यामुळे डिसेंबर २०२३पर्यंत मेट्रो तयार तर झाली पण नागरिकांच्या सेवेत दाखल होण्यासाठी पुढच्या तीन ते चार महिन्याचा अवधी लागेल", अशी माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.
प्रकल्पाची सद्यस्थिती
(नोव्हेंबर २०२३)
बांधकाम : ९७.१%
स्थानकांचे बांधकाम : ९३.६ टक्के
बोगद्यांचे बांधकाम : १०० टक्के
सिस्टीम वर्क : ६३.३ टक्के
मेनलाईन ट्रक वर्क : ७२.०टक्के
टप्पा एक : आरे ते बीकेसी
स्थानकांचे आणि बोगद्यांचे काम : ९८.९ टक्के
स्थानकांचे बांधकाम : ९६.६ टक्के
मेनलाईन ट्रक वर्क : ७२.०टक्के
सिस्टीम वर्क : ७९.२ टक्के
मेनलाईन ट्रॅक वर्क : १०० टक्के
ओसीएस वर्क : ७८.० टक्के
दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड
स्थानक आणि बोगदे : ९६०८ टक्के
स्थानकांचे बांधकाम : ९२.१ टक्के
सिस्टीम वर्क : ५० टक्के
मेनलाईन ट्रॅक : ५६ टक्के
ओसीएस वर्क : ४७.९ टक्के