राहुल गांधींचे गुरु सॅम पित्रोदांचे राम मंंदिरावर बेताल विधान; म्हणाले,"राम मंदिर महत्वाचे की..."
28-Dec-2023
Total Views | 205
नवी दिल्ली : देश अयोध्येतील राम मंदिराच्या तयारीत व्यस्त असताना काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, राम मंदिर हाच खरा मुद्दा आहे का? शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य हे प्रश्न राम मंदिरापेक्षा मोठे आहेत. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. असं मोठं वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
एएनआयसोबत बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले, "मला कोणत्याही धर्माबद्दल काही अडचण नाही. मंदिरात एकदा तरी जायला हरकत नाही, पण तुम्ही ते मुख्य व्यासपीठ बनवू शकत नाही. देशात आज अनेक मोठे प्रश्न आहेत. मात्र, त्या प्रश्नांना बगल दिली जात आहे. मोदी हे केवळ हिंदूंचे नाही तर सर्व धर्मियांचे पंतप्रधान आहेत. आणि हाच संदेश भारतातील जनतेला हवा आहे. राम मदिरापेक्षा रोजगाराबद्दल बोला, महागाईबद्दल बोला, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि देशपुढील असलेल्या आव्हानांबद्दल बोला. आज देशांपुढील महत्वाचे प्रश्न हे बाजूला ठेवले जात आहे. राममंदिर हा खरचं देशाचा मुद्दा आहे का? की बेरोजगारी हा खरा मुद्दा आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.