मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने दि. २६ डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात मंगळवारी १९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे दि. १ डिसेंबर ते दि. २६ डिसेंबरपर्यंत एकूण ११७ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यातील ८८ सक्रिय रुग्ण आहेत. दोन रुग्ण रुग्णालयात दाखल असून दाखल एकूण रुग्णांची संख्या ११ झाली आहे. एकूण ४,२१५ उपलब्ध बेडपैकी ९ बेड वापरात आहेत. सदर कालावधीत २,६६६ चाचण्या केल्या असून मंगळवारी ११४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.