साऊथ कोरियाच्या तरुणीचा पुण्यात विनयभंग! व्हिडिओ व्हायरल

    19-Dec-2023
Total Views | 308


Kelly 
 
 
पुणे : साउथ कोरियाची कैली नावाची युट्यूबर पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. कैली पर्यटनासाठी भारतात असताना, एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.
 
 
नारळ पाणी पीत असताना कैली दुकानदाराला सांगते की, तुला भेटून आनंद झाला. तेवढ्यात एक माणूस येतो आणि कैलीच्या खांद्यावर हात ठेवतो. ती त्याला निरोप आणि नमस्कार करते आणि तिथून निघून जाते. येथून निघून गेल्यावर केली तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल सांगते. ती म्हणते की, त्या माणसाला तिला मिठी मारायची होती. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121