प्रमोद चित्ते यांनी मुलींचे लग्न साधेपणाने करीत शैक्षणिक संस्थेला दिला मदतीचा हात

त्यांनी लग्नावर उधळपट्टी करणाऱ्यांना घालून दिला आदर्श

    01-Dec-2023
Total Views |
 

madat photo 


डोंबिवली : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा सोहळा असतो. त्यामुळे हा सोहळा मोठया थाटामाटात पार पडावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्न थाटामाटात होत असताना खर्च ही तसाच होतो. पण लग्न थाटामाटात करून त्यावर खर्च करण्यापेक्षा काही रक्कमेचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करण्याचे काम डोंबिवली नजीक असलेल्या लोढा हवन मधील प्रमोद चित्ते यांनी केले आहे. प्रमोद चित्ते यांच्या ज्येष्ठ कन्या पल्लवी हिचा विवाह साधेपणाने करीत त्यांनी 50 हजार रूपयांचा धनादेश नवी मुंबईमधील सुख सुमन सामाजिक व शैक्षणिक संस्थेला दिला आहे. यावरून लग्नावर अवाढव्य खर्च करणाऱ्यांसाठी प्रमोद यांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे.


डोंबिवली नजीक च्या लोढा हवन परिसरात राहणारे प्रमोद चित्ते यांच्या ज्येष्ठ कन्या पल्लवी यांचा विवाह मंगळवारी पाटीदार भवन येथे संपन्न झाला. प्रमोद हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून खाजगी शिकवणीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे काम करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षणाविषयी त्यांच्यात विशेष ओढ आहे. सुख सुमन सामाजिक संस्था ठाणे जिल्हासह मुंबईत काम करीत आहेत. सध्या संस्था नवी मुंबई, मुंबई,ठाणे, रायगड याठिकाणी काम करीत आहे. शिक्षणाच्या जुन्या पध्दती आहेत आणि नवीन पध्दतीचा मेळ घालून मुलांना कसे विकसित करता येईल हे पाहिले जात आहे. या संस्थेचा संपूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याचा मानस आहे. ही संस्था स्र्वखर्चाने आपले काम करीत आहे. पण अनेक जण स्वत:हून आर्थिक मदत करतात. संस्था त्या सर्वाचे स्वागत करीत असल्याची भावना संस्थेचे संचालक चिमाजी उरसळ यांनी व्यक्त केली.


प्रमोद चित्ते यांनी सांगितले, पल्लवी ही ज्येष्ठ कन्या आहे. आणखी दोन मुली असून त्यांच्या लग्नात ही सामाजिक संस्थेला मदत करणार आहे. त्यावेळी कदाचित या पेक्षा मोठय़ा रक्कमेचा धनादेश दिला जाईल. पल्लवीच्या लग्नानिमित्त सुख सुमन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणा:या संस्थेला 50 हजार रूपयांची मदत केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सध्या मागासलेपणा आला आहे. तो कुठेतरी थांबवा. लहानपणापासून मोठय़ांना मराठी भाषा शुध्द यावी. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेवर विद्याथ्र्यानी प्रभूत्व मिळावे या उद्देशाने शैक्षणिक क्षेत्रात काम करणा:या संस्थेला मदत करीत आहे. या संस्थेचे कार्य जिथे शाळा नाही तिथे गावांनी त्यांना जागा द्यावी. संस्था त्याठिकाणी शाळा बांधते आणि मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सुख सुमन संस्थेची निवड केली आहे असे ही त्यांनी सांगितले.


दरम्यान भाजपाचे ग्रामीण मंडळ सरचिटणीस रविंद्र पाटील आणि धर्मराज फाऊंडेशनचे महेंद्र पाटील यांच्यासह नववधू पल्लवी आणि तिचे पती अमेय यांच्या हस्ते संस्थेला धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने चिमाजी उरसळ यांच्यासह त्यांची टीम उपस्थित होती.
 

-----------------------------------------------------------
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121