ठाकरे गटाला दणका! किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स
07-Nov-2023
Total Views | 87
मुंबई : ऐन दिवाळी तोंडावर असतानाच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावला आहे. बुधवारी (८ नोव्हें) चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांची सप्टेंबर महिन्यात २ तास चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ECIR दाखल केले होते. ईडीने आता पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ११ सप्टेंबर, १३ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या परंतु याच प्रकरणी आता ईडीने पेडणेकरांना समन्स बजावले आहे.