अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर हातोडा? सत्र न्यायालयाचा आदेश

    07-Nov-2023
Total Views | 205
 
Parab
 
 
मुंबई : ऐन दिवाळी तोंडावर असतानाच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांचे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे रिसॉट अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप करत ते ते बांधतांना सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने जप्तीची कारवाई केली होती.
 
हे साई रिसॉट नियमांचे भंग करून बांधल्याचा आरोप करण्यात आला होता. ईडीने हा बंगला तात्पुरत्या स्वरूपात जप्त केला होता. ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र देखील सादर केले. हे रिसॉट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली होती. तब्बल दीड ते दोन वर्ष त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर ईडीने कारवाई केली होती. दरम्यान, आमदार अनिल परब यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या रिसॉटशी काही संबंध नसल्याचे देखील परब म्हणाले होते. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121