नवी दिल्ली : भारत हा २०२५ सालापर्यंत अव्वल ५ जागतिक जैव-उत्पादन केंद्रांमध्ये समावेश होईल, असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, भारताची जैव जैवतंत्रज्ञानामध्ये, जागतिक व्यापार आणि भारताच्या समग्र अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या जैव-अर्थव्यवस्थेची, महत्वपूर्ण साधन बनण्याची क्षमता आहे, असेदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, प्रगती मैदानावर ४ ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत जैवतंत्रज्ञानावरील "ग्लोबल बायो-इंडिया - २०२३" हे भव्य आंतरराष्ट्रीय संमेलन होणार असून त्याच्या संकेतस्थळाचा प्रारंभ करताना राज्यमंत्री डॉ. सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जैव अर्थव्यवस्थेने गेल्या ९ वर्षात वार्षिक चांगला विकास दर पाहिला आहे. भारत आता जगातील अव्वल १२ जैवतंत्रज्ञान ठिकाणांपैकी एक असून आता अव्वल ५ मध्ये येण्यास सज्ज असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.