Ind vs Aus 3rd T20 भारत - ऑस्ट्रेलियात निर्णायक टी-20 सामना, टीम इंडियाने जिंकला टॉस

    02-Nov-2025   
Total Views |

Ind vs Aus 3rd T20
 
मुंबई : (Ind vs Aus 3rd T20) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यांची मालिका होबार्ट येथील ओव्हल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज (०२ नोव्हेंबर २०२५) दुपारी ०१:४५ वाजल्यापासून खेळली जात आहे. ही लढत भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. यामुळे भारतीय संघात टीम मॅनेजमेंटने तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. (Ind vs Aus 3rd T20)
 
भारतीय संघात तीन मोठे बदल
 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या (Ind vs Aus 3rd T20) तिसऱ्या टी-20 सामनाचा टॉस भारताने जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सांगितले की, भारतीय संघात आजचे सामन्यासाठी तीन मोठे बदल करण्यात आले आहे. संघात संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर-बल्लेबाज म्हणून जितेश शर्मा आज मैदानात उतरला आहे. हर्षित राणाच्या जागी अर्शदीप सिंगला सामील करण्यात आलं आहे. तर कुलदीप यादवच्या जागी वाशिंग्टन सुंदरला स्थान देण्यात आले. (Ind vs Aus 3rd T20)
 
ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल
 
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र एकच बदल करण्यात आला आहे. जोश हेजलवूड जागा शान ॲबोटने घेतली आहे. जोश हेलवूड हा आता या मालिकेचा भाग नाही. तो फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात होता. 
 
भारतीय संघ: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
 
ऑस्ट्रेलियाचा संघ: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, शॉन अ‍ॅबॉट, मॅट कुह्नेमन. 
 
 

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.