भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी नाबार्डने राबवला 'दक्षता जागरुकता सप्ताह'! कर्मचाऱ्यांनी घेतली सत्यनिष्ठेची शपथ

    03-Nov-2023
Total Views | 52

NABARD


मुंबई :
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या वतीने शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी 'दक्षता जागरूकता सप्ताहाअंतर्गत' 'वॉकेथॉन' आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता मुख्य दक्षता अधिकारी यू. दिनेश शानभाग यांच्या हस्ते या वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
 
नाबार्डच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दरवर्षी 'दक्षता जागरूकता सप्ताह' राबवण्यात येतो. यावर्षीही दिनांक ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात हा सप्ताह राबवण्यात आला आहे. नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक गोवर्धनसिंह रावत यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
 
यामध्ये नाबार्ड बँक परिसरातील इतर बँकांचादेखील सहभाग असतो. गेल्या अनेक वर्षांपासून नाबार्डकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी नाबार्डच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सत्यनिष्ठेची शपथ घेतली.
 
नाबार्डच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये या सप्ताहाचे आयोजन केले जाते. दक्षता जागरूकता सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गायन आणि चित्रकलेसह विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121