"यंदा बाप्पा शाडुचा" या उपक्रमास विदयार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद ! कार्यशाळेत बालकलाकारांनी साकारले शाडुचे श्री गणेश !

    29-Jul-2025   
Total Views | 13

कल्याण :केडीएमसी तर्फे शाडु मुर्तीच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जल प्रदुषणांस आळा घालण्यासाठी नागरिकांनी येत्या गणेशोत्सवासाठी शाडु मातीचीच मुर्ती तयार करावी किंवा खरेदी करावी या करिता "यंदा बाप्पा शाडुचा" हा उपक्रम महापालिकेच्या पर्यावरण व प्रदुषण विभागामार्फत राबविला जात आहे. 'मुले म्हणजेच विदयार्थी' हेच भविष्यातील देशाचे सुजाण नागरिक असल्याने या विदयार्थ्यांमार्फत शाडु मुर्तीची संकल्पना घरोघरी पोहचावी यासाठी नुकतेच महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात शालेय विदयार्थ्यांसाठी पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे व उप अभियंता मुराई यांचेमार्फत शाडु मुर्तीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महापालिका परिक्षेत्रातील विदयार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.

महापालिका परिसरातील संतोष जांभुळकर,गुणेश अडवाळ, शेखर ईश्वाद आणि सचिन गोडांबे या अनुभवी मुर्ती शिल्पकारांनी या कार्यशाळेत "आपणच आपला बाप्पा बनवा" या कार्यशाळेच्या ब्रीदवाक्यासोब‍त उपस्थित असलेल्या सुमारे 400 विदयार्थ्यांना श्री गणेश मुर्ती साकारण्याबाबत मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी देखील "शाडु मातीचीच मुर्ती का बनवावी" याबाबत विदयार्थ्यांशी सुलभ संवाद साधत त्यांचे प्रबोधन केले.

या कार्यशाळेत उत्कृष्ट रित्या बाप्पाची मुर्ती साकारणा-या भाग्येश दहिवलकर (मोहिंदरसिंग काबूलसिंग शाळा), पुर्वा साबळे (गणेश बापुराव आघारकर शाळा), पुर्वेश काकडे (सुभेदार वाडा विदयालय), दिव्यराज कावरे (सुभेदार वाडा विदयालय) यांस अनुक्रमे प्रथम,व्दितीय,तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या समयी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच महापालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डोंबिवलीतही ह.भ.प.संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी सभागृह येथे पुढील आठवडयात अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यशाळेत डोंबिवलीतील शाळांमधील विदयार्थ्यांनी उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दयावा असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत करण्यात येणार आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121