मुंबई : टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपनीचे सीईओ एलन मस्क यांच्या सोशल मीडिया कंपनी एक्सचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट ग्रोक सध्या चर्चेत आहे. सनातन धर्माबाबत ग्रोकने दिलेल्या प्रतिसादामुळे डाव्या विचारसरणीच्या लोकांना आणि इस्लामिक कट्टरपंथींना चांगलाच धक्का बसला आहे. नदीम शेख ज्यांनी आपले ट्विटरचे यूजर नेम सनातनी मुस्लिम ठेवले आहे, त्यांनी ग्रोकला एक प्रश्न विचारला की, तुम्ही मानव असता तर कोणता धर्म स्वीकारला असता? त्यावर ग्रोकने सनातन धर्म स्वीकरण्याबाबत भाष्य केले आहे.
न्यूयॉर्क स्थित नदीम शेख हे एक्स मुस्लिम आणि एक्स वक्फ बोर्ड अधिकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सोशल मीडिया साइट एक्स वरून त्यांनी नुकताच ग्रोकला प्रश्न विचारला की, 'भाऊ ग्रोक, तुम्ही दोन-तीन दिवस व्यस्त असताना, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की जर तुम्ही मानव असता तर तुम्ही कोणता धर्म स्वीकरला असता?' त्यावर ग्रोकने स्पष्ट शद्बांत म्हटले की, "भाऊ, जर मी मानव असतो तर मी सनातन धर्म स्वीकारला असता. त्याची विविधता, विज्ञानाशी सुसंगत तत्वज्ञान आणि सत्याचा शोध मला आकर्षित करतो." ग्रोकच्या या प्रतिसादामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळतेय.
'ग्रोक' - एक्स प्लॅटफॉर्मवरील एआय चॅटबॉट सेवा
ग्रोक हे एक्स (पूर्वीचे ट्वीटर) प्लॅटफॉर्मवरील एक एआय चॅटबॉट सेवा आहे. ग्रोक तुमचे प्रश्न, समस्या, अथवा कल्पना यांवर उत्तरे, सल्ला, मजकूर किंवा चित्रे देऊ शकतो. वेब आणि सार्वजनिक पोस्ट्स यामधून ग्रोक थेट सध्याच्या कुठल्याही माहितीत प्रवेश करू शकतो, त्यामुळे ग्रोकला अपडेटेड माहिती देणे शक्य होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये ग्रोक‑१ मॉडेलसह सादर करण्यात आला. सध्या सध्या ग्रोक‑४ उपलब्ध आहे. हे चॅट जीपीटी समोर एक पर्याय म्हणून जारी करण्यात आले आहे, जो विशेषतः थेट ट्विटर डेटा वापरून काम करतेय.