मुंबई : मराठीत पाठ्या न लावल्याने नवी मुंबईत मनसे आक्रमक झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन संपून आस्थापनावर मराठीत पाठ्या लागल्या नसल्याने मनसेने आक्रमक भुमिका घेतली आहे. नवी मुंबईच्या नेक्सेस ग्रँड सेंटर मॉल आस्थापनेवरील इंग्रजीत लावलेल्या पाट्या या मराठी करण्या साठी मनसे कार्यकर्त्यांनी मॉल प्रशासनाला घेरावा घाचला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात मॉलच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर बीएमसीने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली आहे. महापालिका आजपासून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाई सुरू करणार आहे. यासाठी पालिका सज्ज झाली असून प्रत्येक वॉर्डात दोन यांप्रमाणे २४ वॉर्डांत ४८ अधिकारी दुकानांची पाहणी करत आहेत.
२७ नोव्हें. रोजी कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले. मात्र पोलिसांनी याप्रकरणी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासनाने याप्रकरणी वेळीच हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसेतर्फे करण्यात आली आहे.