चीन सरकारची मशिदींवर वक्रदृष्टी! हजारो मशिदी जमीनदोस्त

    25-Nov-2023
Total Views |
 china
 
बीजिंग : चीनने मुस्लिमांचे प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदींना बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चीन आता शिनजियांग प्रांताबाहेरील मशिदींविरोधातही कारवाई करत आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार चीन अनेक वर्षांपासून शिनजियांगमधील अल्पसंख्याक उईगुर मुस्लिमांवर अत्याचार करत आहे.
 
रिपोर्टनुसार, शिनजियांग व्यतिरिक्त चिनी अधिकाऱ्यांनी उत्तर निंग्झिया प्रदेश तसेच गान्सू प्रांतातील मशिदी बंद करण्यास सुरुवात केली आहे. असा आरोप रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हुई मुस्लिमांची मोठी लोकसंख्या येथे राहते. हा रिपोर्ट सार्वजनिक दस्तऐवज, उपग्रह प्रतिमांवर आधारित आहे. या मशिदी अधिक चिनी दिसण्यासाठी स्थानिक अधिकारी त्यांच्या रचनेत बदल करत आहेत.
 
२०१६ मध्ये, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी धर्माचे सिनिकायझेशन करण्याचे आवाहन केले होते, म्हणजे धार्मीक विश्वासांना चिनी रूप देणे. यामुळे एक क्रॅकडाउन सुरू झाले जे मुख्यत्वे शिनजियांगच्या पश्चिम भागावर केंद्रित आहे. ११ दशलक्षाहून अधिक उईगुर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्याक येथे राहतात.
 
गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात चीनवर शिनजियांगमध्ये मानवतेविरुद्ध गुन्हे करत असल्याचा, आरोप करण्यात आला होता. ह्युमन राइट्स वॉचने सुद्धा चीनवर गंभीर आरोप केले आहेत. पण चीनने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121