मुंबई : विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर श्रीलंकन टीमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. श्रीलंकन सरकारने क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई करत एका समितीची नेमणूकदेखील केली आहे. त्यानंतर आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, वनडे वर्ल्डकपमध्ये अतिशय लाजिरवाण्या कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. ते गुणतालिकेत अव्वल ८ संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरले. त्यामुळे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमधून ते बाहेर झाले आहेत. आयासीसी स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होता न येण्याची क्रिकेट इतिहासातील श्रीलंकेची ही पहिलीच वेळ आहे.
वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने ९ सामने खेळले. यातील २ सामन्यात विजय मिळवत त्यांनी फक्त ४ अंक मिळविले. दरम्यान, यंदाच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर कारवाई करण्यात आली असून आगामी स्पर्धेकरिता संघाची वाटचाल खडतर अशीच झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेला पूर्वीसारखीच लय, परर्फॉर्मन्स यात दोन्हीमध्ये सरस अशी कामगिरी संघाला करावी लागणार आहे.