भोपाळ : मध्य प्रदेशातील दमोहमध्ये शाहवाज खान नावाच्या तरुणावर 'लव्ह जिहाद'चा आरोप करण्यात आला आहे. शाहवाजवर २० वर्षीय पीडित तरुणीने लग्नाच्या नावाखाली बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. दीड वर्षांपूर्वी आरोपी शाहवाज याच्याशी तिची भेट झाल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले.हे प्रकरण मध्य प्रदेशातील दमोह कोतवाली भागातील आहे. पीडितेने सांगितले की, ती दीड वर्षांपूर्वी धगत चौकाजवळील बाजार मोहल्ला येथे राहणाऱ्या नसीर खान यांचा मुलगा शाहवाज खान याला ओळखत होती. यानंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले.
पीडितेने सांगितले की, शाहवाजने लग्नाच्या बहाण्याने तिला जबलपूर नाका येथे सुरू असलेल्या टाऊनवरी रेस्टॉरंटमध्ये बोलावले. तेथे त्याने तिला एका केबिनमध्ये बोलावून लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर शाहवाजने तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
लग्नापूर्वी धर्मांतरासाठी दबाव
पीडितेने सांगितले की, काही काळानंतर तिने शाहवाजवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा शाहवाजने पीडितेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर शाहवाजने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.पीडितेने पुढे सांगितले की, “ह्या सर्व प्रकरणानंतर सुरुवातीला मी हे कोणालाच सांगितले नाही, पण रक्षाबंधनाच्या वेळीही आरोपीने मला धमकावले आणि माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि मला हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिली.यानंतर मी माझ्या पालकांना संपूर्ण घटना सांगितली.यानंतर पीडिता तिच्या कुटुंबीयांसह गुरुवार दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी दमोह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली. यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली.
तसेच याप्रकरणी पोलीस स्टेशन प्रभारी विजयसिंग राजपूत यांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर आवश्यक तपास करून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी, आरोपी शाहवाज खानविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३६६, ५०६, ३-२-५, ३(१) डब्लू (२) आणि अनुसूचित जाती/जमाती आणि मध्य प्रदेश धार्मिक कलम ३/५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान दमोहमध्ये या वर्षी जानेवारी महिन्यात ही लव्ह जिहादचे असेच एक प्रकरण उघडकीस आले होते. ज्यात ती पीडित मुलगी दमोहची होती आणि बेंगळुरूमध्ये कामावर गेली होती. तेथे फारुख नावाच्या तरुणाने राजू असल्याचे भासवून पीडित मुलीला फसवले होते आणि तो मुलीचे शोषण करायचा.यावेळी आरोपीने या मुलीची सर्व कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. तसेच अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून तरुणीवर अत्याचार केला. मुलगी कशीतरी बेंगळुरूहून पळून दमोहला पोहोचली.
त्याचबरोबर २०२१ मध्ये दमोहमध्ये लव्ह जिहादची एक घटना घडली होती, ज्यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणीला मुस्लिम तरुणाने अडकवले होते. यानंतर तरुणीने मुस्लिम तरुणासह तीन लाख रुपये घेऊन घरातून पळ काढला.