बिहारची जातीय जनगणना चुकीची, स्वपक्षियांकडून नितीश कुमारांना घरचाच आहेर
05-Oct-2023
Total Views | 106
बिहार : बिहार सरकारने केलेल्या जाती आधारित जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारचे इमारत बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशोक चौधरी यांनी गुरुवारी सांगितले की, 'आमच्या जातीतील लोकांचे फोन येत आहेत की, आम्ही पासी जातीचे आहोत. तरी, जनगणनेनुसार आमची संख्या कमी असल्याचे बोलले जात आहे.'
जेडीयूच्या प्रदेश सरचिटणीस प्रगती मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धनुक जातीची लोकसंख्या योग्य पद्धतीने मोजली नसल्याची तक्रार केली आहे. तसेच अमत ही अत्यंत मागासलेल्या लोकांची जात आहे. गणनेनुसार त्याची लोकसंख्या दोन लाख ८५ हजार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या जनगणनेनंतर विरोधी पक्ष भाजपने नितीश कुमार सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या मोजणीनंतर तक्रारींची मालिका सुरू आहे. जनगणनेबाबतच्या या तक्रारींचे निवारण सरकार करेल, अशी आशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अखिलेश सिंह यांनी व्यक्त केली आहे.