महाराष्ट्र : मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली असून मराठा आंदोलकांकडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांकडून राज्यातील मराठा नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांना मराठा संघटनांनी घेराव घातला.
दरम्यान, राज्य सरकारकडून उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली. त्यासंदर्भात राज्य सरकारने कार्यवाही करताना आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल राज्य शासनाने स्वीकारत कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.