इझमायट्रिपचा कव्‍हर जिनियससोबत सहयोग

जागतिक पर्यटकांना सोईस्‍कर व स्थिर एम्‍बेडेड संरक्षण देणार

    28-Oct-2023
Total Views |

Easemytrip
 
 
 
 
इझमायट्रिपचा कव्‍हर जिनियससोबत सहयोग
 

जागतिक पर्यटकांना सोईस्‍कर व स्थिर एम्‍बेडेड संरक्षण देणार
 

मुंबई: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल व्‍यासपीठाने आज एम्‍बेडेड संरक्षणासाठी इन्‍शुअरटेक कव्‍हर जिनियससोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. कव्‍हर जिनियसचे पुरस्‍कार-प्राप्‍त जागतिक वितरण व्‍यासपीठ एक्‍सकव्‍हरला समाविष्‍ट करत इझमायट्रिपचे ग्राहक त्‍यांची तिकिटे बुक करताना कॅन्‍सल फॉर एनी रिजन (सीएफएआर) ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शनसह एम्‍बेडेड सर्वसमावेशक ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शनचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना एक्‍सकव्‍हरच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड ग्राहक अनुभवामधून फायदा मिळेल, जे सुरूवातीच्‍या सेलपासून व्‍यवस्‍थापन व क्‍लेम्‍सपर्यंत ग्राहकांच्‍या सर्व गरजांची हाताळणी करते. त्‍यांच्‍या पुरस्‍कार-प्राप्‍त सर्विस डिझाइनने सपोर्ट तिकिटे ७ पटीने कमी केल्‍याचे दाखवले आहे.
 
सीएफएआर‍ ग्राहकांमध्‍ये आणि ऑनलाइन ट्रॅव्‍हल एजन्‍सींमध्‍ये (ओटीए) मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनत आहे. यामागील कारण म्‍हणजे ते एकसंधी अनुभव देते, ज्‍यामध्‍ये कोणतीही रिफंड विनंती केल्‍यास पेपरवर्क प्रक्रियेचा त्रास दूर करते. तसेच ओटीएसाठी विमा परवान्‍याची गरज दूर करते.
 
इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले, " देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी मागणीमध्‍ये वाढ होत असताना कव्‍हर जिनियसकडे जागतिक कौशल्‍य आहे, जे आम्‍हाला एआयद्वारे समर्थित सर्वोत्तम प्रोटेक्‍शन प्रदान करण्‍यासाठी आवश्‍यक होते, ज्‍यामधून ग्राहकांना एकसंधी अनुभव व स्थिरता मिळते. सीएफएआर हे अद्वितीय सोल्‍यूशन आहे, जे ग्राहकांना अनपेक्षित स्थितींमध्‍ये हमी देईल."
 
कव्‍हर जिनियससाठी एपीएसी येथील धोरणात्‍मक सहयोगांचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष बार्ने पिअर्स म्‍हणाले, " ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शन लोकप्रिय असण्‍यासह अत्‍यावश्‍यक गरज बनले आहे. ते सर्वोत्तम सुविधा देण्‍यासाठी सुसज्‍ज असण्‍यासह प्रवाशांना सर्व प्रकारच्‍या अनिश्चिततांसाठी प्रोटेक्‍शन घेण्‍यास प्रेरित देखील करते. आम्‍हाला इझमायट्रिपसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना नाविन्‍यपूर्ण व बीस्‍पोक उत्‍पादने प्रदान करण्‍यात येतात, जे किफायतशीर असण्‍यासोबत सुलभपणे उपलब्‍ध होतात."
 
अग्रलेख
जरुर वाचा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली...

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121