मुंबई : नुकताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलायवा रजनीकांत यांनी ३३ वर्षांनतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार असल्याची घोषणा केली. या दोन्ही दिग्गज कलाकारांबद्दल बोलावे तितकेच कमी, पण रजमीकांत यांनी ट्विट करत माझ्या मार्गदर्शकासोबत पुन्हा काम करण्याची मिळालेली संधी ही आनंद देणारी आहे असे म्हटले होते. त्यांच्या या पोस्टमुळे अमिताभ बच्चन भावूक झाले आहेत.
सध्या अमिताभ आणि रजनीकांत तब्बल ३३ वर्षांनी पुन्हा एका चित्रपटातून एकत्र येणार आहे. त्याची जोरदार चर्चा आहे. काल रजनीकांत यांनी अमिताभ यांच्यासोबत पुन्हा काम करत असतानाचा अनुभव आणि त्यांचा प्रवास, संघर्ष यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर बिग बी यांनी देखील रजनीकांत यांच्याप्रती आदराची भावना व्यक्त करत रजनीकांत म्हणजे एक उत्कृष्ट लीडर आहात, तुमची आणि माझी तुलना होऊच शकत नाही, असे म्हणत अमिताभ यांनी रजनीकांत यांचे कौतुक केले आहे.