वाड्यात भात कापणीला सुरुवात

पावसाच्या भीतीने कापणीसोबत झोडणीही सुरू

    20-Oct-2023
Total Views | 90
wada


वाडा :
हळवार भात पीक कापणीस तयार झाले असून, वाडा तालुक्यातील शेतकर्‍यांनी हळवार भात पीक कापणीला सुरुवात केली आहे. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील पाऊस पडण्याची शक्यता विचारात घेऊन शेतकर्‍यांनी कापणीसोबतच झोडणीही सुरू केली आहे.

वाडा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळवार भात पिकाची लागवड करीत असतात. हे भात पीक ९० ते ११५ दिवसांच्या कालावधीत कापणीस तयार होते. हळवार भात पीक कापणीची (लाणी) लगबग सुरू असून, येथील शेतकर्‍यांना पावसाची भीती कायम सतावत असल्याने भात कापणीच्या (लाणी) काही नैसर्गिक नियमांना बगल देत कापणी सोबत एका बाजूला घाईघाईने झोडणीच्या कामेही उरकली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

भात पिकाची कापणी करून त्याला किमान दोन दिवस सूर्यप्रकाश (ऊन) देणे आवश्यक असते. त्यानंतर भारे बांधील करून उडवे रचून उब दिली जाते. अशी प्रक्रिया केल्यास भाताचा दाणा खडण्यास मदत होते. मात्र, आता पावसाच्या भीतीने लाणीच्या काही नैसर्गिक नियमांना बगल देत, शेतकरी कापणीसोबत झोडणीची कामे उरकून घेताना दिसत आहेत. यंदा पावसाचा मुक्काम अधिकच वाढल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी मिळेल, त्या वेळेत भात कापणीसोबत झोडणीचे ही कामे करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121