ललित पाटीलने कशी दिली पोलीसांच्या हातावर तुरी? काय घडलं?

    19-Oct-2023
Total Views | 219
 
Lalit Patil
 
 
मुंबई : ड्रग्स माफिया ललित पाटील याला बुधवारी (१८ ऑक्टो.) बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. साकीनाका पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ललित पाटीलची चौकशी सुरु आहे. ललित पाटील पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा अशी माहिती ललितने पोलिसांना दिली आहे.
 
ललितवर नजर ठेवण्यासाठी ससूनमध्ये पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. या तैनात पोलिसांना तो पैसे द्यायचा. ससूनच्या बाहेर अनेकदा त्याचा भाऊ भूषण पाटीलला तो भेटायचा. ज्या दिवशी तो ससूनमधून फरार झाला त्या दिवशी दीड तासात परत येतो असं सांगून तो बाहेर पडला आणि फरार झाला. त्यामुळे या प्रकरणात डॉक्टर आणि पोलिसांचा ही समावेश आहे. दरम्यान, पुणे पोलीस मुंबईत आले आहेत. ललित पाटीलचे दोन सहकारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोन्ही सहकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस आले आहेत. या दोघांचा पुणे पोलीस लवकरच ताबा घेणार आहेत.
 
ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींना पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावं आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याची माहिती मिळते आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121