मुंबई : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंटेलिजन्स ब्युरो मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीद्वारे भारतीय गुप्तचर संस्थेत सामील होऊन काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे.
या भरतीअंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोकडून ६७७ पदांवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी दि. १४ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. सदर भरतीमध्ये सुरक्षा सहाय्यक, मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांवर भरती केली जाणार असून या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ नोव्हेंबर २०२३ ठेवण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर मागास प्रवर्गातील आणि महिलांसाठी अर्ज शुल्क ५० रुपये ठेवण्यात आले आहे. तर उमेदवारांसाठी वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.