मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्ली येथे विश्वचषकाचा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याच्या आधीच सरावादरम्यान, भारताच्या प्रमुख खेळाडूला दुखापत झाली आहे. भारताचा कप्तान आणि स्टार फलंदाज रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताला सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
वाचा सविस्तर >> टीम इंडियाला मोठा धक्का; सलामीवीर शुभमन गिल पुढील सामन्यातून बाहेर
इशान किशन, सुर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा हे तिघेही नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होते. त्यावेळी रोहित शर्माला दुखापत झाली. रोहित शर्माच्या डाव्या मांडीला दुखापत झाली असून ही दुखापत झाल्यावर रोहित शर्मा अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. पण सध्यातरी रोहित शर्माच्या या दुखापतीवर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे, गिल तंदुरुस्त नसल्यामुळे इशान किशनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कोणतीही अपडेट्स दिलेली नाही. त्यामुळे रोहित शर्माला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्चचषकाचा ९ वा सामना अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळविला जाणार आहे.