मुंबई : भारताचा सलामीवीर शुभमन गिल विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या जागी युवा फलंदाज इशान किशन याला संघात संधी देण्यात आली होती. शुभमन गिलला आरोग्य विषयक कारणांमुळे खेळता आले नव्हते. त्यामुळे त्याचे चाहते एकप्रकारे निराशा झाले होते.
दरम्यान, शुभमन गिलला चेन्नईला पोहोचल्यापासून खूप ताप असून बीसीसीआयने तीन दिवसांपूर्वी सांगितले होते की, पहिल्या सामन्यासाठी चेन्नईला पोहोचल्यानंतर शुभमनला खूप ताप आला होता. त्याच्या चाचण्या केल्या असता त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना अफगाणिस्तानविरुध्द बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. या सामन्यात गिल खेळणार का, असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडला होता. त्यासंदर्भात बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. शुभमन गिल दिल्लीला जाणार नाही. तसेच, गिलवर चेन्नई येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत.
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिल रविवारच्या ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात खेळला नव्हता. दरम्यान, भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तान यांच्यात ११ऑक्टोबरला दिल्ली येथे होणार आहे.