मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रिकेटप्रेमी अहमदाबादला पोहोचत आहेत. १४ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय रेल्वेनेही पुढाकार घेऊन विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर वर्ल्डकप साठी भारत पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईवरून गुजरातसाठी दोन विशेष एक्स्प्रेस सोडल्या जातील. पश्चिम रल्वेने हे नियोजन केले आहे. क्रिकेट मॅचसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याची यंदा हि पहिलीच वेळ आहे.
१३ ऑक्टोबरला रात्री आणि १४ ऑक्टबरला पहाटे ट्रेन रवाना होणार आहे. या दरम्यान मुंबईहून सकाळी वंदे मातरम् एक्स्प्रेस आणि दुसरी शताब्दी एक्स्प्रेस संध्याकाळी सुटणार आहे. तर अश्या चार एक्स्प्रेस क्रिकेट सामन्यासाठी मुंबईवरून गुजरातला रवाना होणार आहे.