हिंदू मुस्लिम वादावरून कंगना आणि उर्फीमध्ये जुंपली
30-Jan-2023
Total Views | 81
34
मुंबई : हिंदुत्वाबद्दल सतत भाष्य करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि तोकडे कपडे घालण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम कलाकार या विषयावरून वाद रंगला आहे. पठाण सिनेमावरुन सुरु झालेला वाद आता युनिफॉर्म सिव्हिल कोडपर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने केलेल्या एका ट्विटमुळे नवा वाद जोर धरत आहे.
कंगनाच्या ट्विटवर रिट्विट करत मॉडेल उर्फी जावेद हिने सडेतोड उत्तर दिलं आहे. तर कंगनाने माय डिअर म्हणत उर्फीच्या रिट्विटचं उत्तर दिलं.
कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणते, "चांगलं निरीक्षण… या देशाने फक्त आणि फक्त खान यांच्यावर प्रेम केलं आहे. मुस्लिम अभिनेत्रींना तर डोक्यावर घेतलंय. त्यामुळे भारतात द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. जगात भारतासारखा दुसरा देश नाही."
कंगनाच्या ट्विटवर उर्फीने स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. उर्फी म्हणते, "हे कसं विभाजन आहे. मुस्लीम कलाकार, हिंदू कलाकार.. कलेचं धर्मात विभाजन झालेलं नाही. त्याठिकाणी फक्त कलाकार असतात."
उर्फीला प्रतिउत्तर देत कंगनाने प्रश्नार्थक ट्विट केले आहे, "असं झालं असतं तर हे एक आदर्श जग असतं. पण हे शक्य नाही’ जोपर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड येत नाही, तोपर्यंत हा देश संविधानाने विभाजलेला दिसेल. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोडची मागणी करू.. करूया ना?