राष्ट्रवादी काँग्रेसने मोगलशाही स्विकारलीयं!

    03-Jan-2023
Total Views |

राष्ट्रवादी काँग्रेसने मोगलशाही स्विकारलीयं!
भिवंडी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे वक्तव्य घृणास्पद व महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही औरंगजेबाचे पाठराखण करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस ही मोगलशाही स्विकारली आहे. त्याच पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून राज्यभरात दौरे सुरू आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हा ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर ते आज आले होते. त्यावेळी भिवंडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार व जिल्हाध्यक्ष किसन कथोरे, सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील लहान मुलांनाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व औरंगजेबाने केलेला छळ माहिती आहे. मात्र, हेतुपुरस्सरपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून वक्तव्य केली जात आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला जनतेने स्विकारले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचे ३००३ सरपंच, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ८४३ सरपंच निवडून आले. यापुढील काळात लोकसभा-विधानसभांबरोबरच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका समन्वयाने लढविल्या जातील. लोकसभेत ४५ प्लस आणि विधानसभेत २०० प्लस जागांवर भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना निवडून येतील. यापुढील काळात ५१ टक्के मते मिळविण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार आहे, त्या ठिकाणी भाजपाची ताकद उभी केली जाईल. भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त मदत त्यांच्या उमेदवाराला होईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. ठाणे ग्रामीण क्षेत्रातही १०० टक्के जागांवर आमचा विजय होईल. या भागात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ताकद आहे. त्यामुळे निश्चितच यश येईल, असे ते म्हणाले.
 
सामनामधून अजित पवारांच्या वक्तव्यांची भलामण करण्यात आली आहे, याकडे पत्रकारांनी बावनकुळे यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, ``हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आता सामना राहिलेला नाही. सामनाचे अंतरंग व बाह्रयरंग हिरवे झाले आहे. सामनाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव छापण्याचा अधिकार गमावलेला आहे.''
 
सामनामधून अजित पवारांच्या वक्तव्यांची भलामण करण्यात आली आहे, याकडे पत्रकारांनी बावनकुळे यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, ``हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आता सामना राहिलेला नाही. सामनाचे अंतरंग व बाह्रयरंग हिरवे झाले आहे. सामनाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव छापण्याचा अधिकार गमावलेला आहे.''
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अध्यक्षांच्या दालनात झालेल्या प्रकारावरून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढाई लढावी लागली होती. तर आता सभागृहात झालेल्या विधानावरून आमदार जयंत पाटील यांना अधिवेशनकाळापूरता निलंबित करण्यात आले होते. सांगली बॅंकेंची चौकशी सुरू झाली असली, तरी त्यांनी त्याला सामोरे जावे. या सरकारकडून कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा मिळणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
मुरबाड रेल्वे होणारच : कपिल पाटील
 
कल्याण-मुरबाड-नगर रेल्वेमार्गासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा समावेश केला आहे. सध्या हा प्रस्ताव नीती आयोगापुढे गेला आहे. त्याला नीती आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुरबाड रेल्वे होणारच, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
अंजुरदिवे येथून २५०० बाईकची रॅली
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अंजुरदिवे येथे आगमन झाल्यानंतर, त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर २५०० मोटारसायकलींसह भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाग घेतला. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांनी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.