सांगलीत साकारलाय १ लाखांहून अधिक आरसे असलेला गणपती!
03-Sep-2022
Total Views | 115
2
सांगली : खानापूर तालुक्यातील चिंतामणी गणेश मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त नाविन्यपूर्ण गणरायाची मूर्ती बनवण्याचा उपक्रम दरवर्षी होत असतो. यावर्षी या मंडळाने १ लाखांहून अधिक छोट्या आकाराच्या आरशांपासून सजावट करत गणेश मूर्ती तयार केली आहे. ही मुर्ती तब्बल सहा फुट उंचीची आहे. बाप्पाची आगळी वेगळी सजावट आणि सामाजिक संदेश देणारी सजावट करणाऱ्या नागनाथ नगरच्या चिंतामणी गणेश मंडळाने जागतिक स्तरावर बहुमान मिळवला आहे.
चिंतामणी गणेश मंडळाने यापूर्वी माणिक मोती मूर्ती, खेळण्यातल्या गोट्यांचा गणपती, ५१ किलो कडधान्याची सजावट असलेला गणपती, तर १,२१,१११ शर्ट बटनपासून गणपती मूर्ती तयार केल्या आहेत. देशातील बरीच समाजमाध्यमे या गणेश मंडळाची दखल घेत असतात. शेतकरी कुंटुबातील मंडळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून ही मूर्ती तयार करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रदूषणाची होणारी हानी रोखण्यासाठी या गणेश मंडळाने यावर्षी या सुबक मूर्तीचे विर्सजन न करता एका आर्ट गॅलरीला देणगी स्वरूपात देण्याचा मानस आहे.