माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती झाली असल्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी प्रादेशिक अस्मिता आणि लोकशाही वगैरे वगैरे अशी काही कारणं सांगितलीत. ते सांगत असताना काळलं तरी वळवणार कसं तर ते तुम्ही वळवताय अशा निरर्थक कोट्या करण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही. आता कॉंग्रेस,राष्ट्रवादीशी युतीकारून हिंदुत्वाला तिलांजली दिली या कारणानेच शिवसेनेत उठाव झाला हे उघड आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वळचणीला उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली असल्यास काही वावग वाटायला नको. आक्षेप असा आहे कि राम गणेश गडकरींचा पुतळा ब्रिगेडने फोडला किंवा भांडारकर हल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे? बाबासाहेब पुरंदरेंवरील ब्रिगेडची चिखलफेक असो वा पुण्यातील लालमहाला बाहेरील दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याची ब्रिगेडने केलेली विटंबना असो उद्धव ठाकरे या सगळ्याचे समर्थन करतायत का?
सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडबद्दल थोडक्यात जाऊन घेऊयात -
९० च्या दशकात पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोल्यात मराठा सेवा संघाची स्थापना केली. मराठा आणि कुणबी समाजाचे संगठन करावे असा हेतू मराठा सेवा संघाच्या पाठीमागे असल्याचे सांगण्यात येते. पुढे यातूनच महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठी संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. २०१६ साली संभाजी ब्रिगेड या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला. आणि संभाजी ब्रिगेड नावाचा राजकीय पक्ष अस्तित्वात आला. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जरी ब्रिगेडची स्थापना झालेली असली तरी काही अपवाद वगळता मराठा समाज कधीही ब्रिगेडच्या पाठीशी उभा राहिला नाही. यासाठी ब्रिगेडची हिंदू विरोधी पॉलिसि जबाबदार असल्याचे सांगण्यात येते.
ब्रिगेडने शिवसेनेला दिलेली तंबी आणि शिवसैनिकांची उडालेली तारांबळ या बद्दल जाणून घेऊयात -
२०१७ साली दादर येथील शिवसेना भवनावरील हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र काढून टाका असा इशारा ब्रिगेडने शिवसेनेला दिला होता. त्यावेळी शिवसेना भवनावर हल्ला होईल या भीतीने शिवसैनिकांना सेना भावना भोवती पहारा द्यावा लागला होता. झालं असं कि शिवसेना भवनाच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय. या पुतळ्याच्या वरच्या भागात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं चित्र लावण्यात आलंय. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याच्या वर बाळासाहेबांचं छायाचित्र लावण्याला संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला आणि बाळासाहेबांचं चित्र हटवण्याची मागणी ब्रिगेडनं केली होती. त्याआधी मराठा मोर्चा बाबत शिवसेनेच्या मुखपत्रातून केलेल्या टिपणीबद्दल किंवा व्यंगचित्रावरून वाद निर्माण झाला आणि त्यामुळे नवीमुंबईच्या सामनाच्या कार्यालयावर हल्ला झाला या हल्याची जबाबदारी ब्रिगेडने घेतली होती. आता त्याच ब्रिगेडबरोबर युती केल्याने ठाकरेंवर सगळीकडून टीका होतीये.
बाबासाहेब पुरंदरेंवर चिखल फेक,भांडारकर इस्टीट्युटवरील हल्ला ते गडकरीं, दादोजी कोंडदेव आणि वाघ्या कुत्र्याचा पुतळ्याची तोडफोड करणारी ब्रिगेड -
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील हल्ल्याने ब्रिगेड चर्चेत आली. पण त्याही पलीकडे जाऊन हिंदुत्वाला नवे ठेवणे, ब्राम्हण आणि मराठा समाजात तेढ निर्माण होईल या साठी कटकारास्थाने रचणे द्वेषाचे राजकारण करणे असे उदयोग ब्रिगेडने सातत्याने केलेत. त्यातूनच मग जेम्स लेन प्रकरणातून बाबासाहेब पुरांदारेंची खोटी बदनामी केली गेली. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा दावा करत, दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी केली.
पुढे त्यांच्या मागणीला यश मिळाल्याने आपण ब्रिगेड आणखीनच चेखाळली. त्यानंतर डिसेंबर २०१० मध्ये लाल महलातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आला.वाघ्या कुत्रा हा छत्रपती महाराजांचा कुत्रा नव्हता असे म्हणत ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहा जवळील संभाजी उद्यानातील पुतळा तोडला आणि मुठा नदीच्या पत्रात फेकून दिला. या पुतळ्याची स्थापना आचार्य अत्रे यांच्या हस्ते २३ जानेवारी १९६२ साली करण्यात आलेली होती. त्यामुळे आता ब्रिगेडशी युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना ब्रिगेडची ही सगळी कृत्य मान्य आहेत असा अर्थ घ्यायचा का?
शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा ठाकरे ब्रिगेड युती हा काकांचा शिवसेना संपवण्यासाठी शेवटचा वार आहे का ?
२०१९ नंतर शिवसेनेला राजकीय दृष्ट्या अधोगतीकडे घेऊन जाणारे निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतले असल्याचे मत राजकीय पंडित व्यक्त करतात. त्यात प्रामुख्याने हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाईज करून शिवसेनेने कॉंग्रस आणि राष्ट्रवादीशी युती केली त्याचे परिणाम एकनाथ शिंदेंच्या रूपाने आज सगळ्यांसमोर आहेत. त्यानंतर राजकीय आणण्यासाठी फारश्या उपयोगी नसलेल्या उलट हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने बदनाम असलेल्या सुषमा अंधारेंना पक्षात सामील करून घेतले.
सुषमा अंधारेंच्या पक्षप्रवेशाने उरले सुरलेले काही शिवसैनिक ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आणि याही पलीकडे जाऊन ठाकरेंनी ब्रिगेडशी युती करून उरले सुरले जनमत गमावले अशा चर्चा सुरु आहेत. याचे कारण निवडणुकीच्या आखाड्यात अथवा मराठा समाजात ब्रिगेडला फारशी मान्यता नाही. आता ब्रिगेडच्या पाठीमागे दस्तुरखुद्द शरद पवार असल्याचे मागे राज ठाकरेंनीचं बोलून दाखवले होते.
असे असले तरी शरद पवारांना राजकीय पक्ष म्हनुन ब्रिगेड मोठी व्हायला नकोय. त्यात महाविकास आघाडीनंतर शिवसेनेच्या मतदार संघात राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवायला सुरुवात केलीये. आता सुषमा अंधारे आणि ब्रिगेडींचे लाटांबर ठाकरें भोवती लावून दिले कि शिवसेनेचा उरलासुरला मतदार त्यांच्या पासून दुरावेल आणि शिवसेनेच्या कमजोरीचा फायदा आपल्याला होईल या इराद्याने काकांनीच म्हणजेच शरद पवारांनी ब्रिगेड आणि शिवसेना युती घडवून आणलीये का असा प्रश्न उपस्थित होतोय.