ठाकरे सरकारच्या काळात रझा अकादमीला बळ देण्यात आलं!

आमदार नितेश राणेंचं विधानसभेतील संपूर्ण भाषण जसंच्या तसं!

    25-Aug-2022
Total Views | 174


Nitesh Rane1
 

मुंबई : "एका बाजूला दाऊदशी व्यवहार करायचा, एका बाजूला शकीलला घेऊन फिरायचं. दुसऱ्या बाजूला रझा अकादमीच्या लोकांना इथे कामं करू द्यायची. कोण रझा अकादमी जिचा संस्थापक अध्यक्ष हा इस्लामाबादचा. हीच रझा अकादमी बाळासाहेबांच्या विरोधात आवाज उचलायची. ज्या रझा अकादमीला देशाचं संविधान मान्य नाही. त्या संस्थेला मोठं करण्याचं काम मविआच्या काळात केलं.", असा खळबळजनक आरोप आमदार नितेश राणेंनी लक्षवेधी मांडताना केला. यावेळी समाजवादी पक्षाच्या आमदाराने हरकत घेतली. त्यावर तुम्ही सपाचे आमदार आहात की रझा अकादमीचे आमदार?, असा सवालही त्यांनी विचारला.
 
"ठाकरे गटाच्या नेत्यांद्वारे "हे बेईमानांचं सरकार, गद्दाराचं सरकार आहे," असे रोज एकच भाषणं दिलं जातं. दुसरा त्यांच्याकडे मुद्दाच नाही. मुंबईबद्दलही त्यांची तशीच भूमिका आहे. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मुंबईचं दरडोई उत्पन्न ३ लाख ८३ हजार रुपये सांगितलं जातं. पण या सगळ्यात मराठी माणसाचं उत्पन्न किती? मुंबईतील राहणीमान मराठी माणसाला कधीतरी परवडतं का?" दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकचा राजीनामा का घेतला नाही?, शिव विकास आघाडी हे नाव का बदललं?, यासह कोरोनाकाळातील भ्रष्टाचार यासह इतर मुद्द्यांवर असा प्रश्न आमदार राणेंनी विचारला.
 
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ते म्हणाले. "मुंबईकरांना आम्ही कोकणातील लोकं जेव्हा विचारतो तेव्हा ते सांगतात. बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, असं सांगितलं जातं. मुंबईला मराठी माणूस हा बाहेर का फेकला गेला. राज्यपालांनी एक वाक्य जेव्हा मुंबईबद्दल बोललं होतं. त्यावर सगळे असले-नसलेले लोकं बोलू लागले. पण मराठी माणूस आज मुंबई या आर्थिक राजधानीमध्ये नेमका मराठी माणूस कुठे आहे? मुंबईमध्ये राहायला त्याला परवडतं का? मुंबईमध्ये जी एक स्टँडर्ड ऑफ लिवींग लागते. ती माणूस पचवू शकतो का? हा खरं म्हटलं तर या निमित्ताने खरंच विचारायला पाहिजे. पण मुंबईतला राहणारा मराठी माणूस हा अवघ्या आत्ता वीस पंचवीस टक्क्यावर जो राहिलाय. त्याचा नेमकं जबाबदार कोण? हे मुंबईतल्या मराठी माणसाच्याबद्दल बोलताना कोण बोलत नाही?" असा प्रश्नही राणे यांनी यानिमित्ताने विचारला.
 
शिवविकास आघाडी नाव का बदललं?
 
'ठाकरे सरकारने आपल्या आघाडीचं शिवविकास आघाडी नाव दिलेलं का बदललं,' असा सवालही त्यांनी विचारला. महाविकास आघाडी करायला लागलं एवढा दबाव कुणाचा होता, असा सवालही राणेंनी विचारला. "शिवसेनेचा काँग्रेस होऊन देणार नाही. आणि ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस झाली तर मी शिवसेनेचं हे दुकान बंद करीन हे आदरणीय बाळासाहेबांचे शब्द होते हे हे लोक विसरले म्हणून हे एका अशा एका रांगेमध्ये बसायला लागतंय. हा बाळासाहेबांचा शाप आहे.", अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली.
 
'गद्दार'वरुनही घेरलं
 
"विरोधी पक्षाने हे सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सरकार स्थापन झाल्यापासून ते आत्तापर्यंत सतत हे बेईमान लोकांचं सरकार आहे गद्दार लोकांचं सरकार आहे सतत हे दोन शब्द स्थापन झाल्यापासून त्यांच्यावर टीका केली जाते. कुठेही जावोत हेच शब्द असतात. उदय सामंत यांच्या मतदारसंघात असो वा अन्य कुठल्याही मंत्र्याच्या मतदार संघात रोज सगळीकडे एकच भाषण दिलं जातं. महाराष्ट्रात कुठेही गेलं तरीही एकच टेप रेकॉर्डर सुरू असतं. पण नेमकं आता या निमित्ताने या अंतिम आढावा प्रस्ताव वाचल्यानंतर नेमकं महाराष्ट्राशी बेईमानी आणि गद्दारी कोणी केली आहे हे थोडं मी मांडणार आहे, असेही ते म्हणाले.
 
मराठी माणूस बाहेर घालवला आणि स्वतःला दोन दोन घरं बांधली!
 
राज्यपालांनी जे वक्तव्य केलं तर हे लगेच सगळे पेटून उठलेत, नसलेले लोकं लगेच बाहेर आले आणि पत्रकार परिषदा घेऊ लागले. ते म्हणाले, 'मराठी माणसाबद्दल बोलता कामा नये.' "अरे बाबा! मराठी माणसाबरोबर तुम्ही जे वर्षानुवर्षे जी बेईमानी केली. त्याबद्दल कधी आपण कधीच बोलताना दिसत नाही. मराठी माणूस आर्थिक सक्षम झाला पाहिजे. मराठी माणूस हा ज्या पद्धतीने आज मोठ्या मोठ्या घरामध्ये अन्य जाती समाजाचे लोकं राहतात. तसं आमचा मराठी माणूस पण दोन मोठ्या घरामध्ये गेला पाहिजे.दोन-दोन गाड्या गेल्या पाहिजे. अशी भावना कधी विचारात आणली नाही. ", असे नाव न घेता त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.
 
मातोश्री १ आणि मातोश्री २ तयार झाली पण मुंबईतील मराठी माणूस बाहेर फेकला गेला!
 
"आमचं मातोश्रीचं एक मातोश्री दोन तयार पण मराठी माणूस बदलापूरला जायला पाहिजे, अशी भावना ठेवणारे काही लोकं आपल्याकडे आहेत. आम्ही मराठी माणसाचे आहात पण नेमकं मराठी माणसाला मुंबईमध्ये जगण्यासाठी तुम्ही ठेवलं तरी आहे का? हाही प्रश्न या निमित्ताने विचारासारखा वाटतो. अतुल भातखळकर यांनी आपल्या भाषणातून मुंबईकरांची व्यथा मुद्देसुद मांडली होती. म्हणून मी मुद्दामून आकडा लिहून ठेवला. जवळपास मुंबई महापालिकेची २३ हजार पदे रिक्त आहेत. मग मराठी मुलांना ही पदं का दिली गेली नाहीत. ही सगळी नोकरभरती करुन मराठी मुलांना देता आली असती. वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असूनही त्यांनी का भावना व्यक्त केली नाही? मराठी मुलांची कामं व्हावीत, ही भावना मनात का आली नाही.", असा सवालही त्यांनी विचारला.
 
कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत!
 
कोरोना काळातील असंख्य टेंडरबद्दल कामांबद्दल चर्चा होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणाची चौकशीही लावली आहे. मात्र, आज फक्त कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. महापालिकेचे विविध अधिकारीच फक्त चौकशांना सामोरे जात आहेत. पण कर्मचारी-अधिकाऱ्यांना घरात बसून कोण आदेश देत होता? याबद्दल आपण चर्चा करणार आहोत का? आपण जबाबदार धरणार नाही का?, असा सवालही त्यांनी विचारला. "या लोकांना स्वप्न पडलं का एवढे एवढे पैसे बाजूला ठेवायचे. आता आम्हाला जिन्यावर घोषणा देऊन दाखवतात. पन्नास सगळं okay तर आम्ही घोषणा द्यायची का? सचिन वाजेचे पन्नास खोके मातोश्री okay आम्ही बोलायंचं का? हा आम्ही बोलायचं मग ते शंभर शंभर कोटी दर महिन्याला जे जे मोजण्याचं काम तेव्हा होत होतं ते कुणाच्या आदेशानं होत होतं. आमदार अमीत साटम यांनी जो उल्लेख केला. त्याला कोण वाचवत होतं? याकडेही लक्ष द्यायला पाहिजे.", असा सवाल त्यांनी सचिन वाझे प्रकरणात विचारला.
 
मुंबई महापालिका भ्रष्टाचारावरुन सवाल!
 
"वर्षानुवर्षे होणारा जो भ्रष्टाचार आहे. याच्यावर जोपर्यंत चौकशी होत नाही. तोपर्यंत काही होणार नाही. माझ्याकडे आकडेवारी आहे. जम्बो कोविड सेंटरचे पंधराशे कोटींचे कंत्राट विकत घेतले. ते कुठे गेलं. अंधेरी स्पोर्ट्स कॉप्लेक्समध्ये ते देण्यात आले. ते कुणी विकत घेतलं? कोणासाठी विकत घेतलं? एवढं मराठी माणसाची तुम्हाला एवढी काळजी होती ना? मग का विचार केला नाही? ते हे जे काय वर्षानुवर्षे तुम्ही महापालिकेमध्ये टेंडर देताय. ते तुम्ही मराठी माणसालाच देणार? हा का विचार केला नाही? मग तेव्हा तुम्हाला टेंडर देताना मराठी माणसं का आठवत नाहीत.
 
कोण आहे पुण्य पारेख ?

"पुण्य पारेख कोण आहे? मुंबईतील जितके जम्बो कोविड सेंटर आहेत, ते एकाच व्यक्तीच्या नावावर कसे? तो एवढा मोठा तज्ज्ञ आहे की झोपेतही जंबो कोविड सेंटर तयार करू शकतो. दर दिवसाला पंचवीस हजारचं भाडं घेतो. कोविड सेंटरचा लाभ मुंबईकरांना झाला का? कोरोना काळात एका बाजूने रुग्ण दगावत होते. दुसरीकडे असे प्रकार सुरू होते. जसा पोलीस खात्यात सचिन वाझे होता तसा मुंबई महापालिकेतील सचिन वाझे कोण? याचा शोध घेतला पाहिजे. मुंबईतील कंत्राट साडेसात वाजल्यानंतर डीनो मोर्यालाच कशी मिळायची? राहुल गोम्ज, नंदकिशोर चतुर्वेदी तो जुहूचा कुणतरी जसरा ही सगळी मराठी माणसं आहेत का? या लोकांना श्रीमंत केलं. मुंबईतील मराठी माणसांना सक्षम केलं असतं तर खऱ्या अर्थाने टोलेंजंग इमारतीत मराठी माणसं रहायला गेली असती.", असेही राणे म्हणाले.
 
दाऊदशी व्यवहार करणारे लोकं त्यांच्या मंत्रीमंडळात!
 
माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवरुनही राणेंनी मविआतील नेत्यांना घेरले. "हिंदुत्वाशी गद्दारी कुणी केली. एकनाथ शिंदेंनी हा उठाव केला. बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाला संरक्षण देण्यासाठी हा उठाव करण्यात आला. आज चौकाचौकात बाळासाहेबांचा फोटो लागतोयं. आज ते म्हणतात, "आमच्या वडिलांच्या नावानं मतं मागू नका." मग माझा सवाल आहे. अडीच वर्षांत बाळासाहेबांचं स्मारक का तयार झालं नाही. दाऊदच्या बरोबर व्यवहार करणारे लोकांबरोबर हे त्यांच्या मंत्रीमंडळात बसतात आणि हे लोकं बाळासाहेबांचं नाव घेतात.", अशी टीका त्यांनी केली.
 
"त्या काळामध्ये वृत्तपत्रात छोटा शकीलने एक मुलाखत दिली होती. त्याला आपल्या कारकिर्दीत पाच लोकांना मारायचे होते. त्या पाच लोकांमध्ये त्याच्यात ठेवलेली. त्याच्यामध्ये पाचवा एकवाक क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे होते. आणि चौथ्या क्रमांकावर माझे वडील नारायण राणे साहेब होते. अशा दाऊद बरोबर छोटा शकील बरोबर वावरणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही सत्तेमध्ये तुमच्या वडिलांच्या जीवावर उठलेले आणि बोलतात आमच्या वडलांच्या नावानी मतं मागू नका. आणि बाळासाहेब आता यांचे वडील झाले.", अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121