दिल्ली मद्य घोटाळा – मनीष सिसोदिया यांच्यावर हवालाप्रकरणीही गुन्हा दाखल होणार

सीबीआय लुकआउट सर्क्युलर जारी करण्याची शक्यता

    21-Aug-2022
Total Views | 82

manish

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल सरकारच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) हवालाप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या सीबीआयच्या रडारवर असून मद्य घोटाळ्याप्रकरणी त्यांची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात येत आहे. सिसोदिया यांच्यावर खासगी मद्यविक्रेते आणि व्यापारी यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून सरकारचा १४४ कोटी रुपयांचा महसूल बुडविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खासगी मद्यविक्रेत्यांना फायदा पोहोचविण्यासाठी सिसोदिया यांनी दिल्ली सरकारची नवे अबकारी कर धोरण लागू केल्याचाही आरोप सिसोदिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
 
सीबीआयने या घोटाळ्याची चौकशी हाती घेतली असून दोन दिवसांपूर्वीच सिसोदिया यांच्या घरात तब्बल १४ तास छापेमारी केली होती. त्यानंतर आता सिसोदिया यांच्यावर ईडीनेदेखील कारवाईची तयारी केली आहे. याप्रकरणी सुरू असलेल्या सीबीआय चौकशीमध्ये संगनमतामे आर्थिक घोटाळा झाल्याचे सीबीआयला आढळून आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आता हवालाप्रकरणी ईडी सिसोदिया यांच्यावर गुन्हा नोंदविणार आहे.दरम्यान, मद्य घोटाळ्याप्रकरणी अद्याप सीबीआयने सिसोदिया यांना अटक केलेली नाही. मात्र, सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआय आता लुकआउट सर्क्युलर जारी करण्याच्या विचारात असल्याचे समजते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121