नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याचे सर्व चाहते, त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. बुधवारी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. परंतु अद्यापही त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही आहे.
बुधवारी त्यांना हृदयविकारचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आता ४५ तास उलटून गेले तरीही अद्याप ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. तसेच काही सूत्राद्वारे असे समजत आहे की, त्यांची प्रकृती चिंताजनक असून आता त्यांच्या हृदयासोबत मेंदूला धोका वाढला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम कसून प्रयत्न करत आहेत.
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. जिममध्ये वर्कआऊट करताना श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनंतर त्यांची एन्जॉग्राफी आणि एन्जॉप्लास्टी करण्यात आली. परंतु राजू सध्या कोणत्याच उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. काल त्यांच्या मुलीनेही सर्वांना आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट केली होती, त्यामध्ये ती म्हणतेय की, 'त्यांना आता औषधांची नाही तर प्रार्थनेची गरज आहे.'
यानंतर राजू यांची प्रकृती सुधारली होती, परंतु ती सुधारणा फार काळ टिकली नाही. त्यांचा रक्तदाब अद्यापही स्थिर झालेला नाही. त्यांचे बीपी पुन्हा कमी-जास्त होत आहे. त्यामुळे आता त्यांच्या हृदयासोबतच मेंदूची स्थितीही नाजुक आहे. त्यांचा मेंदूही उपचारांना प्रतिसाद देत नाही. राजू यांचे डॉक्टार म्हणाले की, एन्जॉप्लास्टीनंतर सहसा रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होते परंतु एवढे तास उलटूनही राजू यांच्या तब्येत कोणताही बदल नाही. सध्या कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, गॅस्ट्रोलॉजी टीम, न्यूरोलॉजी अशा डॉक्टरांच्या विविध तुकड्या राजू यांच्यावर उपचार करत आहेत.