मुंबई : शिवसेनेनतील एकनाथ शिंदेंच्या उठवाला ठाकरे कुटुंबाची घराणेशाही हेही एक कारण होते, रामदास कदम यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर याच गोष्टींवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेले ते ट्विट चांगलेच चर्चेत आहे. शिवसेनेत जसे उद्धव ठाकरेंनंतर आदित्यचं शिवसेनेची सूत्र हाती घेणार हे अखिलीत सत्य आहे तशी परिस्थिती मनसे मध्ये येणार नाही असेच यातून संदीप देशपांडे यांना सुचवायचे आहे.
अब राजा के बाद बेटा राजा नाही बनेगा , राजा वही बनेगा जो हकदार होगा अशा शब्दांत मनसेमध्ये शिवसेनेसारखे स्वकर्तृत्वावर मोठे झालेल्या, जनतेशी घट्ट नाळ जोडल्या गेलेल्या नेत्यांची उपेक्षा होणार नाही असे आश्वासन दिले गेले आहे. एकाच कुटुंबाचे सदस्य असूनसुद्धा राज ठाकरे आणि अमित ठाकरे ही पिता- पुत्रांची जोडी आपले वेगळेपण सांभाळत आहे , हे महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगळेपणच म्हणावे लागेल.