Mumbai BJP President MLA Ameet Satam : मुंबई महापालिका निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपललेली असताना भाजपने आपला पहिला डाव आखला आहे. अत्यंत आक्रमक, तडफदार नेतृत्व आणि मुंबईची खडान् खडा माहिती असलेले आमदार अमीत साटम (MLA Ameet Satam) यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करत उबाठा (शिवसेना) आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्याची सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आमदार अमीत साटम (MLA Ameet Satam) मुंबई भाजप अध्यक्ष असतील ही घोषणा करण्यात आली. आमदार अमीत साटम (MLA Ameet Satam) हे अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार आहेत. साटम यांच्या रुपाने उच्चशिक्षित चेहरा मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी देण्यात आला आहे. मे २०००मध्ये महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (एमजीएमआयएमएसआर) हे शिक्षण पूर्ण केले. तसेच मुंबई विद्यापीठातून पर्सोनल मॅनेजमेंट स्टडीज [MMS] पूर्ण केले.
जुलै १९९८ मध्ये मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयात कला शाखेतून प्रथम श्रेणी गुणांसह पदवी उत्तीर्ण झाले आहेत.राजकीय कारकिर्दीत भाजपतर्फे देण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ पासून आतापर्यंत अमीत साटम तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सुमारे ४ लाख लोकसंख्या असलेल्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातून ३ लाख मतदारांचे प्रतिनिधित्व ते करतात. तसेच त्यांनी पाच वर्षे महापालिकेचे नगरसेवक म्हणून कामकाज पाहिले आहे.पायाभूत सुविधा विकास, शहरी नियोजन, धोरण आखणी, कायदा व सुव्यवस्था पाहणी, जनमत निर्माण, वाद निराकरण, संघटन व्यवस्थापन व नेतृत्व, कायदे निर्मिती, सार्वजनिक धोरण आखणी, विविध सांस्कृतिक, धार्मिक व भाषिक गट तसेच नागरी समाजाशी समन्वय, आरोग्य व स्वच्छता देखरेख, आपत्ती व्यवस्थापन या विषयांची त्यांना हातोटी आहे.लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मुंबईसाठी पहिल्या प्रगत स्ट्रीट लाईट्स प्रकल्पाचे जनक म्हटले जाते. त्यांच्या मोहिमेनंतर शहराने एलईडी स्ट्रीटलाईट्स लागू केले.
२५ हून अधिक सार्वजनिक मैदाने विकसित केल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. तसेच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे विकासकामही त्यांनी आपल्या कारकिर्दीत पूर्ण केले आहे. ६५ दशलक्ष वर्षे जुना गिल्बर्ट टेकडी (जगातील दुर्मिळ खडक रचना) संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. आपल्या विभागातील बेकायदेशीर अतिक्रमण आणि बांधकामांविरोधात उभे राहून पाडकाम धडक कारवाईही त्यांनी केली.या शिवाय पायाभूत सुविधा विकास, शहरी नियोजन व धोरण आखणी, कायदा व सुव्यवस्था पाहणे, लोकमत घडवणे व विवाद निवारण, संस्थात्मक व्यवस्थापन व नेतृत्व, कायदे निर्मिती व सार्वजनिक धोरण आखणी, विविध संस्कृती, धर्म व भाषा असलेल्या समाजासोबत काम करणे, आरोग्य, स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापनावर देखरेख या विषयांवरही त्यांनी काम केले आहे.राजकारणात येण्यापूर्वीही त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली चमक दाखवली होती. टाटा टेलीसर्व्हिसेस लिमिटेड येथे ४ वर्षे मानव संसाधन अधिकारी म्हणून कार्य. जबाबदाऱ्या : भरती, कार्यक्षमता व्यवस्थापन, कौशल्य नकाशीकरण, प्रशिक्षण व विकास, संघटनात्मक विकास, कर्मचारी व्यवहार आदी जबाबदारी त्यांच्यावर होती.
केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईच्या महत्वाच्या समस्या हाताळण्यासाठी आणि परदेशातील नवे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी विविध देशांचे दौरेही केले आहेत. एप्रिल २०११मध्ये त्यांनी हवामान बदल व स्वच्छ ऊर्जा या विषयावर यू.एस. स्टेट डिपार्टमेंट आयोजित इंटरनॅशनल व्हिजिटर्स लीडरशिप प्रोग्राम (IVLP) पूर्ण केला. सप्टेंबर २०१६मध्ये त्यांनी ईस्ट-वेस्ट सेंटर, होनोलुलु (यू.एस. काँग्रेस स्थापन) आयोजित न्यू जनरेशन सेमिनार सांस्कृतिक वारसा या विषयावरील सत्रात सहभाग घेतला.‘वसुंधरा’ या जागतिक तापमानवाढीवरील माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सोबत त्यांचा २० वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे. त्यांनी आत्तापर्यंत अमेरिका, सिंगापूर, इंडोनेशिया, यू.ए.ई., थायलंड, स्वित्झर्लंड, इटली, ब्रिटन, फ्रान्स, चीन, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, जर्मनी, कंबोडिया, म्यानमार या देशांचा दौरा केला.