काश्मीर फाईल्सला पुरस्कार का मिळाला नाही?

    25-Jul-2022
Total Views | 97
y
 
 
 
 
नुकताच ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. देशभरातील विविध भाषेतील अनेक चित्रपट, कलाकर व तंत्रज्ञ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पण द काश्मीर फाईल्स या विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाला या पुरस्कारातून डावलण्यात आल्याची बातमी प्रसारित झाली.
 
 
दी काश्मीर फाईल्स हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. कश्मीरीपंडितांचा झालेला अनन्वित छळ हा या सिनेमाचा विषय. काश्मिरी पंडितांच्या जिहादी अतिरेकी मानसिकतेतून करण्यात आलेल्या हत्या, त्यांच्या बायक मुलींचेवर झालेले लैंगिक अत्याचार,बलात्कार, लहानमुलांना क्रूरपणे घातलेल्या गोळ्या या सगळ्या वास्तवाचे चित्रण या चित्रपटातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मांडले आहे.
 
 
काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून हाकलून लावून विशिष्ठ समाजाने त्यांची बळकावलेली मालमत्ता असे अनेक प्रसंग पाहताना अंगावर काटा येतो. आजही अनेक काश्मिरी पंडित आपल्यच देशात निर्वासितासारखे जगत आहेत. परंतु इतके होऊनही या देशात विशिष्ट धर्माचे लोक सुरक्षित नाही, अशी खोटी ओरड तथाकथित आणि विचारधारेच्या भिंघातून पाहणाऱ्या विचारवंताकडून करण्यात येते.
 
 
त्या तथाकथित विचारवंतांनी काश्मीर फाईल्स प्रदर्शित होऊ नये, या चित्रपटाबद्दल गैरसमज पसरवा इतकच काय थिटरमध्ये जाताना भगवा गमचा घालण्यावर सुधा आक्षेप घेतले. कारण कश्मीर फाईल्स चित्रपटातून विवेक अग्निहोत्रींनी अनेक खोट्या समजुतींवर बोट ठेवले आहे. त्यामुळे कायम अल्पसंख्यांक समाजाची तळी उचलून धरणाऱ्याचा तीळपापड होणे स्वाभाविक होते.
 
 
आपल्या स्वभावाला जागून त्यांनी या काश्मीर फाईल्सचे ट्रोलींग चालूच ठेवले तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त गल्ला केला. परिणामी उद्विग्न झालेल्या या स्वघोषित विचारवंतानी दी काश्मीर फाईल्स सिनेमाला ६८ व्या चित्रपट सोहळ्यात कोणतेही पारितोषिक न मिळाल्याची बातमी जाहीर होताच जल्लोष केला आणि अजिबात सत्य जाणून न घेता फेसबुकवर पोस्ट टाकून आनंद साजरा करायला सुरुवात केली.
 
 
परंतु आता ते स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यात अडकले आहेत. कोव्हीडच्या कारणामुळे ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. त्याचे पुरस्कार आता जाहीर झालेत. दी काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला २०२२ साली त्यामुळे अजून २०२१ आणि २०२२ सालचे राष्ट्रीय चित्रपट जाहीर व्हायला अवकास आहे. दुसरा मुद्द म्हणजे सरकार किंवा कोणतेही पक्ष हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करत नाहीत. त्यासाठी परीक्षक नेमलेले असतात. त्यामुळे कोणाला बक्षीस द्यायचं कोणाला नाही हे संबंधित ज्युरी ठरवतात.
 
 
भविष्यत दी काश्मीर फाईल्सला पारितोषिक मिळेल किंवा कदाचित मिळणार नाही पण मायबाप रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या खेळाला हाऊसफुलचा बोर्ड झळकवून याचा उचित सन्मान आधीच केलेला आहे, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. शिंडलर्सलिस्ट नावाचा स्टीवन स्पीलबर्ग या जगविख्यात दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला सिनेमा, जो ज्यू समाजावर झालेल्या अनन्वित छळावर आधारितन होता.
 
 
जर्मनीत झालेल्या ज्यू समाजाच्या छळाची गोष्ट या चित्रपटातून सांगितली आहे. शिंडलर्सलिस्ट चित्रपट जगभरात अनेकांनी पहिला पण त्यामुळे जर्मन लोकांबद्दल कोणाच्याही मनात द्वेषाची भावना निर्माण झाल्याचे ऐकिवात नाही. तेच कशाला आजवर अनेक सिनेमांमध्ये ज्यू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या गेल्यात मग प्रश्न उपस्थित होतो, तो काश्मिरीपंडितांची व्यथा मांडल्यास त्यात वावग काय?
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121